2 पावलांचे अंतर
माझे आणि चंद्रा मधले 2 पावलांचे अंतर
केहव्हा सुटेल उत्तर सारे आणि मनातले माझे प्रश्न
2 पावले चालून यावे आणि सोडावे प्रश्न सारे
पण दोन पावलांचे अंतर सुटवून शकतील दोन मनातले अंतर?
बघता बघता आमच्या मधले अंतर कमी होत गेले
पावलांचे अंतर कमी झाले परंतु मनातले अंतर वाढले
कमी कसे करू मनातले अंतर आता काही समजे ना
2 पावलांचे अंतर ही आता वाटते प्रकाशवर्षं
प्रयत्न केले खूप सारे पण पण सौवाद मात्र वाद झाला
मग मी आणि चंद्र दोनी रिसुनी दोन कोपऱ्यात बसलो
आणि बघता बघता 2 पावलांचे अंतर प्रकाशवर्षं झाले
संध्याकाळी पुन्हां एकदा आम्हीवाद घालत बसलो
वादा चा सौवाद साधूंनी पुन्हा एकदा हसलो
2 पावलांचे प्रकाशवर्षं आणि प्रकाशवर्षाचे 2 पावले केली
2 पावलांचे अंतर मज काही कळले नाही
संध्याकाळी चहा पिता 2 पावलांचे अंतर मात्र कमी झाले सारे
रात्री माझा मिठीत चंद्र होता आणि चंद्रा चा मिठीत मी
संध्याकाळी केव्हा 2 पावलांचे अंतर झाले कमी ते मला ही अजून कळले नाही
Comments
Post a Comment