एकदा माजा मनातली मैफल तुझा माझ्यात रंगावी

एकदा माजा मनातली मैफल तुझा माझ्यात रंगावी
चंद्राचा साक्षी ने बसावे आणि सूर्या चा साक्षी ने संपवी

स्वप्नातल जशी असते अगदीच तशी असावी
प्रत्यक्षात मात्र खरी खुरी असावी
प्रकाशात धावता धावता स्वप्नांचा माघे
रात्र मात्र आपल्या दोघांची असावी

रोज बोलतो मी तुज्याशी ऑनलाईन 
कधी व्हाट्सएप तर कधी इन्स्टाग्रामवर
कधी मिम ने तर कधी तुने टाकलेल्या स्टोरी मधुनी
ह्याचा पलीकडे गप्पाची मैफिल एकदा तरी रंगावी

तारकांच्या सोबत एक रात्र असावी 
तुझा कुशीत माझं डोकं असावं
गप्पाच्या त्या मैफिली सजाव्या
हळूज तुनी माझ्या केसातून अलगद हाथ फिरवावा

काय आपुले नाते मज काही माहीत नाही
काही ओळख नाही आपुली 
अबोला आहे भावनेच्या आपुल्या दोघांच्या मध्ये
तरीही मी रोज रात्री संवाद साधतो तुझाशी

घराच्या उंबरठ्यावर मी एकटाच उभा आहे
मनात तू आहे मात्र उंबरठ्यावर तू नाही 
या मनाचा बाहेर पण एक मैफल असावी 
थोडी माझी तर थोडी तुझी असावी

माझ्या मनातली ती मैफिल तुझा माझ्यात रंगावी 
चंद्राचा साक्षी ने बसावे आणि आयुष्यभर चालावी


Comments

Popular posts from this blog

किती बोलतो आपण दोघे

वाटे वर उभा राहून

Me uska zikr khule aam nahi karta